Thursday, October 14, 2010

प्रगटली भवानी

       भारतीय संस्क्रुती एवढि महान आहे कि या देशातील रुषि-मुनिंनी साधु-संतानि समाज जिवन सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे लक्क्ष दिले व प्रतेक विषयावर मार्गदर्शन केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ व या चारहि पुरुषार्थावर विस्त्रुत वर्णन फक्त आपल्याच संस्क्रुने केले आहे. विवध मार्ग ,संप्रदाय, पंथ व त्याप्रमाणे केल्या जाणा-या साधना  काहि प्रगट काहे गुप्त आशा अनेक प्रकारच्या साधना.
           बरेचसे मार्ग हे आदिनाथापासून (शंकरापासून) सुरु झालेले आहेत. व काहि मार्ग शक्ति म्हणजे पार्वतिपसुन आलेले आहेत तात्पर्य या दोघांनि द्न्यानाचा विस्तार केला आहे. शाक्ति उपासना हा मार्ग त्यापॆकिच एक. त्यालाच काहि ठिकाणी वाम मार्ग, वामाचारहि म्हटलेले आहे. या मार्गामधे शक्तिसाधना शक्तिउपासना सुरु होति पण पुढे याच संप्रदायात वामाचार सुरु झाला त्याला विक्रुत स्वरुप आले. पंच ’म’ काराची साधना सुरु झाली . पंच ’म’ कार म्हणजे "मद्यं मांसंक्र्च मॊनंच मुद्रा मॆथुनमेवच ॥ मकार पंचक प्राहुर्योगिनां मुक्तिदायकं"॥तंत्रविद्न्यान (पंचमकार रहस्य)  १/-मद्य २/- मांस ३/-मत्स्य ४/-मॆथुन ५/-मुद्रा या पंचमकारांचा तंत्रमार्गामध्ये  गुप्तपणे वापर सुरु झाला . खरे तर मद्य-मांसादिकाचा महभारतामध्ये निषेधच केला आहे." सुरा मत्सया मधुं मांसं आसवं क्रुशरिदनम।धुर्तं प्रवर्तितम ह्येतत तदवेदेषु कल्पितम ॥"महाभारत/शांतीपर्व -सुरा, मांस, आसव , मत्स्य ,मॆथुन आदि व्यवाहार धुर्त लोकांनि स्वत:च्या विषयवासनापुर्तीसाठि केलेले हे कल्पित शाश्त्र आहे याला वेदामध्ये कोणतेहि प्रमाण नाही. उलट महाभारत अनुशासन पर्वामध्ये स्पष्ट लिहले आहे की "ज्याला आपले कल्याण करुन घ्यायचे आहे त्याने मांस भक्षण कधिही करु नये कारण मांस खाल्याने हिंसाव्रुती वाढते , क्रोध वाढतो ,मद्य प्राशन केल्याने मद तयार होतो व भ्रम उत्पन्न होतो विषय भोगाच्या नुसत्या कल्पनेने माणसाचे अध:पतन होते. "ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषुपजायते ।  " (गीता) म्हणुन कालाच्या ओघात तंत्रमार्ग लोकांत अप्रिय झाला  कारण त्यामुळे अनाचार होऊ लागला.
               या सर्व परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील संतानी विचार केला आणि शक्ति उपासनेला एक वेगळा अर्थ प्रदान केला, खरा अध्यात्मिक अर्थ सांगितला . कोणी तीला आदिशक्ति , महा काली, महा सरस्वती, महालक्ष्मी ,चिद्शक्ति,  कुंडलिनी शक्ति, असे वेगवेगळे रुपे आहेत. शारदिय नवरात्र आणि वासंतीक नवरात्र  असे दोन प्रकार आहेत. आश्विन महिन्यातले शारदिय नवरात्र व चॆत्र महिन्यातील वासंतिक नवरात्र.महासरस्वति हि द्न्यानाचे रुप आहे, महालक्ष्मि हि उपसनेचे रुप आहे व महाकाली हि रुद्राचे म्हणजे संहाराचे म्ह. कर्माचे प्रतीक आहे.
               संतानी सर्वसामान्य लोकांचा विचार केला कि हे आध्यात्म तळागाळात पोहचले पाहिजे  त्यांच्या पातळीवर तो खरा अर्थ पोहचला पाहिजे आणि म्हणुन लोकभाषेचा स्वीकार केला व त्याच्या भाषेत उपदेश केला त्यातीलच एक प्रकार म्हणजे "भारुड "  बहुरुढ या शब्दाचे अपभ्रंश रुप म्हण्जेच भारूड लोकसाहित्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रकार . ह्या भारुडाच्या माध्यमातुनच श्री एकनाथ महाराजांनी लोकजाग्रुति केली व धर्मजाग्रुतिहि केली. दार उघड बये दार  उघड ॥ म्हणुन मोगलि सत्तेविरुध्द जगदंबेला हाक मारली. नवरात्रिचे महत्व आणि आदिशक्तिचे खरे स्वरुप नाथ महाराजांनि पुढिल भारुड लिहले आहे .
अनादि निर्गुण प्रगटलि भवानी । मोह महिशासुर मर्दनालागुनी । त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्तालागी तु पावसि निर्वाणई ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वॆत सारुनि माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेइन ।भेदरहित वारीसी जाईन ।ध्रु॥ 
नवविध भक्तिच्या करिन नवरात्रा । करोनि पोटि मागेन द्न्यान्पुत्रा ।धरिन सदभाव अंतरिच्या मित्रा ।दंभ सास-या सांडिन कुपात्रा ॥३॥
पुर्णबोधाची घेईन परडी । आशात्रुष्णेच्या पाडिन दरडी । मनोविकार करिन कुरवंडि ।अदभुत रसाची भरिन दुरडि ।।४। ।
आता साजणी झाले मी निसंग । विकल्प नव-याचा फेडियला पांग । काम क्रोध हे झोडीयले मांग ।केला मोकळा मारग सुरंग । ।५। ।
ऎसा जोगवा मागुनी ठेविला । जाऊनि नवस महाद्वारी फेडिला । एकपणे एकाजनार्दनी देखियेला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
         
             आई भवानि हि अनादि आहे म्ह. तीला जन्म-मरण नाहि, ती आत्मरुप आहे. मोहरुपी महिशासुराला मारण्यासाठि ती प्रगट झालि आहे.आध्यात्मिक ताप, अधिभोतीक ताप,अधिदॆविक ताप आशा तीन तापाची ती झाडणी करण्यासाठि प्रगटली आहे.अशा या निर्गुण-निराकार असणा-या भवानी मातेची उपासना करिन,द्वॆत-भाव, आप-पर भाव सारुन अद्वॆताच्या द्न्यानाची माळ मी घालीन.बोधाचा झेंडा हाती घेउन , भेदरहित वारि करिन .भेदाचे प्रकार:- जीव-जीवाचा भेद, जीव-ईश्वराचा भेद,जीव-जडाचा भेद,जडा-जडाचा भेद,ईश्वर-जडाचा भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, देश-भेद , काल भेद,वस्तु भेद असे सर्व भेद गेले पाहिजे म्हणुन आईचा जोगवा मागेन.नवविधा भक्ति म्हणजेच नवरात्रि , पोटि द्न्यान पुत्र मागेन अंतरिचा सदभाव हाच मित्र, दंभ -हाच सासरा आहे, तो कुपात्र आहे.पुर्ण-बोध म्हणजेच परडी आहे जी देवीला अर्पण करावी लागते. आशात्रुष्णेच्या दरडि पाडिन , मनोविकार कुरंवडि करिन,अदभुत रसाची दुरडि भरिन  (शांताचिया घरा । अदभुत आलासे पाहुणेरा ।द्न्यानेश्वरी) अशि भक्ति करुन मी नि:संग झाले आहे, विकल्परुपी नव-याचा पांग फेडला आहे.काम. क्रोध हेच भजन दरिचे मांग मी झोडले,आणि मोक्षाचा मार्ग मोकळा केला आहे. असा जोगवा (उपासना) मागुन मी महावाक्य हेच महाद्वार तेथे नवस फेडला, जनार्दन स्वामीच्या क्रुपेने सर्वत्र एकत्वाचीच प्रचिती येऊ लागली त्यामुळे जन्म-मरणाचा फेरा सहजच चुकला आहे.
                संताची जगदंबा ! हि अशी आध्यात्मिक आहे. यामूळे खरि समाज जाग्रुती आणि संयमी जिवन , सुखी -समाधानी जिवनाची गुरूकिल्लि आपल्या हाती सहज लागते. अनाचार स्वॆर वर्तणुकीला आळा बसला आहे. हिच खरि नवरात्रि आहे व भवानी मातेचे प्रागट्य आहे.

                                                                                 
  अशोकानंद महराज कर्डिले
  गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडि (पा.)ता. नगर.

2 comments:

  1. Ram Krishna Hari,

    farach god chintan
    asech satat kahitari pathavat ja
    dhanyavaad
    Ram Krishna Hari

    ReplyDelete
  2. खुप गोड व यथार्थ चिंतन!जय गुरुदेव!

    ReplyDelete